वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाशिकरोड येथील पूर्णकृती पुतळाजवळ ईव्हीएम मशीन हटवा लोकशाही वाचवा, स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
नागरिकांनी ई.व्हि.एम हटवण्यासाठी स्वाक्षरी केल्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष दामोदर पगारे हे होते. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वाक्षरी मोहीम ठिकाणी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी- अरुण शेजवळ, चावदास भालेराव, प्रविण बागुल, विश्वनाथ भालेराव, सुहास पवार, पंडित नेटावटे, दीपक भंडारी, बाळासाहेब घायवटे, उर्मिला गायकवाड, सविता पवार, नीतू सोनकांबळे, सुरेखा बर्वे, रोहिणी जाधव, बाळासाहेब जाधव, जयभीम पाईक सम्राट फुले, जितेंद्र श्रीवंत, विष्णू दोंदे, विजय दोंदे, युवराज बर्वे, रोहिदास साळवे, आकाश गायकवाड, दिनेश पुजारी, अनिल खैरनार, निलेश कटारे, संतोष सोनवणे, आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
