photo by Digamber marathe

ईव्हीएम हद्दपार करा

ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

त्यानंतर महंत श्रीकृष्ण राजबाबा मराठे आणि ह भ प जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.”मत आमचा अधिकार आहे, तर त्याचा हिशोब मागने हा सुद्धा आमचा अधिकार आहे..” “इव्हीएम मशीन हटवा, लोकशाही वाचवा..” “ईव्हीएम मशीन हटाव”.. “बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाव”.. अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी झाले.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता सामान्य जनतेच्या ईव्हीएम वरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे. सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यांमध्ये एक प्रकारे जो आनंदाचे वातावरण होते. ते वातावरण आता दिसून येत नाहीये राज्यात, देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपर वरतीच निवडणूक घेतली पाहिजे असे मत नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कृष्णराज बाबा मराठे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी पंथाचे राज्य कमिटी सदस्य ह.भ.प. जनार्दन बळीराम कांदे यांनी सांगितले की, या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

More From Author

photo by Digamber marathe

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुमच्या प्रतिक्रिया

No comments to show.
All copy rights are reserve for nashikjournal.com